घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ |Rs 25 increase in price of domestic gas cylinder
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी २५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलो ग्रॅम एलपीजी गॅस सिलेंडर आता ७९४ रुपयांना मिळणार आहे. हे दर आजपासून लागू होत असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत.
डिसेंबरपासून २०० रुपयांनी वाढ
१ डिसेंबरपासून आतापर्यंत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ झाली आहे. १ डिसेंबर रोजी दर ५९४ रुपयांवरून ६४४ रुपये, १ जानेवारी रोजी दर ६४४ रुपयांवरून ६९४ रुपये, ४ फेब्रुवारी रोजी दर ६९४ रुपयांवरून ७१९ रुपये, १५ फेब्रुवारी रोजी दर ७१९ रुपयांवरून ७६९ रुपये, २५ फेब्रुवारी रोजी दर ७६९ रुपयांवरून ७९४ रुपये प्रति सिलेंडर झाले.