डिझेलवर 4, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस | Rs 4 on diesel and Rs 2.5 on petrol

Share This News

कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी अधिभार लावण्यात येणार आहे. याचा मोठा फटका पेट्रोल, डिझेलला बसण्याची शक्यता आहे.
डिझेलवर 4 रुपये आणि पेट्रोलवर 2.5 रुपयांचा सेस लावण्यात आला आहे. हा सेस ब्रँडेड पेट्रोल डिझेल म्हणजेच स्पीड, एक्स्ट्रा माईल अशा प्रमिअम इंधनावर लागणार आहे. याचा अर्थ सरकारने कृषी क्षेत्रासाठी वेगळा फंड तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या जुन्या कारची वैधता किती दिवसांची राहिल किंवा आपली जुनी कार किती वर्षांपर्यंत वापरायची यासंदर्भातही निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली. जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये जातील, त्यामुळे प्रदूषण नियंत्रणात येईल. तेल आयात बिलातही कमी होणार असून ऑटोमेटेड फिटनेस सेंटर उभारण्यात येणार आहेत. आपल्या खासगी गाड्यांना 20 वर्षांच्या वापरानंतर या सेंटरमध्ये जावे लागणार आहे. खासगी वाहनांना 20 वर्षांनी तर व्यावसायिक वाहनांना 15 वर्षांनी ऑटोमेटेड सेंटरमध्ये दाखल करावे लागणार आहे. जुन्या गाड्यांना रसत्यावरुन हटविणे हाच या निर्णयाचा उद्देश असल्याचे सितारमण यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.