प्रवाशांना RT-PCR टेस्ट अनिवार्य, SOP जारी

Share This News

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्र सरकाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.

मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे.

कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार हळूहळू कठोर निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. 72 तासापूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे.देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे.

  • विशेषत: दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांतून प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात सशर्त प्रवेश देण्यात येणार आहे.
  • दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय.

विमान प्रवास :

  • दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा (सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य असल्यानं) या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पिसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. हा रिपोर्ट 72 तासांपेक्षा जूना नको. तसा रिपोर्ट नसेल तर विमानतळावरच टेस्ट करावी लागणार आहे.
    चार-पाच तासांत त्याचा रिपोर्ट येईल, तोपर्यंत त्यांना क्वॉरंटाईन व्हावं लागेल. मात्र, प्रवाशांकडे स्वत: टेस्ट केलेला रिपोर्ट नसेल तर विमानतळावरुन बाहेर पडता येणार.
  • टेस्ट केल्यानंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. प्रवाशांना आपला फोन क्रमांक, जिथे जाणार आहोत त्या घराचा पत्ता द्यावा लागेल.
  • रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ट्रेसिंग करण्यासाठी म्हणून हा तपशील प्रवाशांकडून टेस्टिंगवेळी घेण्यात येईल.
  • ज्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल आणि प्रोटोकॉलप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल.
  • विमानतळ ज्या भागात आहे, त्या क्षेत्रातील पालिका आयुक्त नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील. वर उल्लेख करण्यात आलेले नियम पाळले जात आहेत का? हे पाहणं त्यांची जबाबदारी असेल.

रेल्वे प्रवास :

  • दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यातून महाराष्ट्रात रेल्वेने दाखल होणाऱ्या प्रवाशांनाही RTPCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट बाळगावा लागेल. राज्यात दाखल होण्याच्या 96 तास आधी RTPCR टेस्ट केलेली असणं बंधनकारक आहे.
  • ज्या प्रवाशांकडे RTPCR टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट नाही, त्यांना कोरोना लक्षणं जाणवत आहेत का? याची पाहणी करण्यात येईल. त्यांच्या शरीराच्या तापमानाची नोंद केली जाईल. लक्षणं नसलेल्या प्रवाशांना गंतव्यस्थळी उतरल्यानंतर घरी जाण्याची परवानगी असेल.
  • ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळतील त्यांना अँटिजेन टेस्ट करावी लागेल. अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी मिळेल.
  • कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या प्रवाशांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये पुढील उपचारांसाठी पाठवण्यात येईल. कोव्हिड केअर सेंटरमधील उपचारांचा खर्च प्रवाशांना स्वत:ला करावा लागेल.
  • रेल्वे स्टेशन ज्या परिसरात आहे, तिथले पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी नोडल ऑफिसर असतील. नियमांचं पालन केलं जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

रस्ते प्रवास :  


  • महाराष्ट्राच्या सगळ्या सीमांवर येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनींग करणार आहेत. लक्षणं आढळतील त्यांची त्वरित टेस्ट करणार.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.