चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करण्यास ग्रामीण जनतेचा विरोध
ब्रम्हपुरी :–अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथे सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि या मध्ये ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालय यांचा प्रस्ताव असून हा प्रस्ताव अतिशय चुकीचा आहे कारण ब्रम्हपुरी शहर हे जिल्ह्यासाठी योग्य असून संपूर्ण सोयी सुविधायुक्त आहे.ब्रम्हपुरी शहर उच्च दर्जाचे शिक्षण व आरोग्य साठी प्रसिद्ध आहे.सर्व उपविभागीय कार्यालय पूर्वीपासूनच येथे आहेत.परंतु अचानक सरकारने चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न करीत असल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून याला विरोध करण्यासाठी दि.9 फेब्रुवारी रोजी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समितीचे निमंत्रक विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात गांग लवाडी सह इतर गावात हजारो नागरिकांनी आक्षेप नोंदविण्याचे काम जोरात सुरू केले आहे त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करू नये आणि भविष्यात जिल्हा निर्माण करतांना ब्रम्हपुरीे लाचं जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विनोद झोडगे यांनी दिला आहे.यावेळी विनोद पाटील,राजेंद्र फुलझेले, संजय भोयर, अविनाश मेश्राम, अभिमन बावणे,पिंटू झोडगे, चीचु भोयर,गुणवंत कराडे यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.