बळीराजाची आता पेरणीपूर्व मशागतीसाठी लगबग

Share This News

पीककर्जाची परतफेड करावी कशी?
मौदा : यावर्षी शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड करुण बॅंकेकडून नवीन कर्जाची उचल केली. कोरोनामुळे शेतकर्‍यांचे बजेट बिघडले असून यावर्षी कोरोनामुळे काही शेतकर्‍यांचा मृत्यूही झाला. सर्व कार्यभार त्यांच्या मुलांवर आला असून यावर्षी शेतकर्‍यांचे गणित या कोरोनामुळे चांगलेच बिघडले आहे. कर्जाची उचल शेत पिकासाठी करण्यात आल्याने निसर्ग वेळेवर कोपत असल्याने कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ येतो. परिणामी शेतकर्‍यांना कर्ज भरणा करण्यासाठी तारेवरची कसरत करित असतो.
बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हणतात. सध्या कोरोना विषाणू मुळे सर्व जग हादरुण गेले आहे. अन्नधान्य पिकवून सार्‍या जनतेची भूक भागवणारा शेतकरी वर्गाने प्रखर उन्हात आता पेरणीपूर्व मशागत करण्याची लगबग सुरु केली आहे.
गुढी पाडव्यापयर्ंत शेतकर्‍यांच्या रब्बी हंगाम संपतो. परंतु यावर्षी परतीच्या पावसामुळे रब्बीची पेरणी लांबली होती. त्यामुळे रब्बी, ज्वारी, सूर्यफूल करडई, गहू, हरभरा हे पीक कापणी व मळणी करण्यासाठी शेतकर्‍यांना पंधरा दिवस उशीर झाला आहे. आता बळीराजाने रब्बी हंगाम संपताच खरीप हंगामातील पेरणीसाठी शेत शिवारात पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ केला आहे. सालगड्याला वाढती मागणी असल्याने व अनेक शेतकर्‍यांकडे सालगडी व बारदाना नसल्यामुळे पशुधनाचा अभाव आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने तांत्रिक शेतीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
मजुरीच्या दरात वाढ झाल्याने यंत्राच्या सहाय्याने कमी खर्चात कमी वेळात कामे आटोपून यासाठी शेतकर्‍यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरणी, रोटावेटर करणे ही कामे हाती घेतली आहे. इकडे कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे कोरोनाच्या भीतीने मजुरांनी शेतीच्या कामाकडे फिरवलेली पाठ यामुळे शेतकरी तांत्रिक शेतीकडे वळला आहे. त्यातच डिझेलचे दर वाढले असून नांगरणी, वखरणी यासाठी ट्रॅक्टरला जास्तीचे म्हणजे सध्या दीडपट पैसे मोजावे लागत आहे. मौदा तालुक्यासह परिसरात शेतकर्‍यांना सरसकट पीक विमा मिळाला नसल्यामुळे शासनाच्या दुटप्पी धोरणावर शेतकरी नाराज झालेले आहेत. हे कृत्रिम असले तरी नैसर्गिक संकटे अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून अशाही परिस्थितीत शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतिच्या कामाला सुरुवात केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.