युवतीची राजस्थानात विक्री; गुन्हा दाखल
नागपूर : फिरायला नेण्याचे सांगून एका ३0 वर्षीय युवतीची राजस्थान येथे २ लाख रुपयात विक्री केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, इमामवाडा हद्दीत राहणार्या ३0 वर्षीय मुलीला २३ डिसेंबरला सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास इंदोरा येथे राहणारी काजल (३५) आणि आलोक बोटमांगे (४0) रा. गड्डीगोदाम यांनी बाहेरगावी फिरायला जाऊ, असे सांगून ते तिला राजस्थान येथे घेऊन गेले. तेथे त्या लोकांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून दिले. त्यांनी तिची तेथे २ लाख रुपयांत विक्री केली. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.