पवारसाहेब सन्मानाने राजसंन्यास घ्या !

Share This News

पंतप्रधान मोदी हेच राष्ट्रीय आपत्ती आहेत अस योग्य वक्तव्य सदाचारी, सत्संगी, सज्जन, सर्वज्ञ, सर्व गुणसंपन्न शरद पवारांनी केल.

देशाला अनेक दशके दोन्ही हातांनी लुटून,ओरबाडुन, भिकेला लावणाऱ्या चोर, लुटारू, दरोडेखोरांना वठणीवर आणल्यामुळे पवारसाहेबांना मोदी ही राष्ट्रीय आपत्ती वाटणारच!

गांधी घराण्यातील दोन पंतप्रधानांनी देशसेवेसाठी बलिदान केले असे पवारसाहेब म्हणतात! पवारसाहेब, देशसेवी गांधी घराण्याची तुम्हाला इतकी जर भावनिक कळकळ आहे तर त्या घराण्याची तुम्ही साथ संगत का सोडली?

अतिरेकी भिंद्रनवाल्याच भूत कोणी निर्माण केल? का निर्माण केल? कोणाला संपवण्यासाठी निर्माण केल? आणि शेवटी कोण संपल? हे बलिदान आहे की केलेल्या चुकांचा परिणाम आहे? हे देखील विस्ताराने आजच्या पिढीला सांगितलं तर बरं होईल!

मोदी गांधी घराण्यावर खालच्या भाषेत टीका करत आहेत अशी गांधी घराण्याची वकिली करताना देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना संसदेपासून ते रस्त्यापर्यंत असंसदिय अपशब्द वापरणाऱ्या तुमच्याच गांधी घराण्याच्या बालिश बालबुद्धी नेतृत्वाला वडिलकीच्या नात्याने चार खडे बोल सुनवावेसे तुम्हाला का नाही वाटले?

शौर्य कुणी बजावले आणि छाती कोण बडवतोय? अशी उपरोधिक टीका अपरिपक्व, अज्ञानी, अबोध, अजाण राहुल गांधींनी केले असती तर एकवेळ समजण्यासारख होत, पण कोण्या एकेकाळी देशाचा संरक्षणमंत्री राहिलेला, राष्ट्रीय पातळीवरचा जबाबदार, परिपक्व असा तुमच्यासारखा जेष्ठ नेता जेंव्हा असे बेताल, बुद्धिभ्रष्ट विधान करतो तेंव्हा साऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाते!

२०२४ ला आपलं काय होणार? ही भीती आपल्याला आज पछाडतेय! आपल्या प्रदीर्घ राजवटीत आपण केलेल्या अक्षम्य चुका देशाला कळून चुकल्याची भिती आता सतावू लागलीय! देशातील आजच्या अस्थिर परिस्थितीला आपणचं जबाबदार आहोत ! आपले अतिरेकी पाकिस्तानी प्रेम, आपला देशद्रोह्यांसाठीचा कळवळा, आतंकवाद्यांना खुल समर्थन देशवासियांना व जगाला कळून चुकल्यामुळेच आपली आज बेभान व बेताल अवस्था निर्माण झालीय !

आपला फसवा हिंदुस्थानी प्रेमाचा आणि नमकहराम पाकिस्तानी समर्थक चेहरा उघडा पडलाय! अपराधीपणा सतावू लागल्यामुळेच बुद्धी सैरभर झालीयं, भरकटलीय !

जो विषय गंभीर तिथे, मोदी खंबीर ! हा देशवासियांचा विश्वास आहे. देशातल्या इमानदार लोकांसाठी मोदी लहर आहे. बेईमान लोकांसाठी मोदी जहर आहे आणि देशद्रोही, दलालांसाठी मोदी कहर आहेत!

पवारसाहेब, हेच तुमचं खरं दुःख आहे नां?

पवारसाहेब, सध्याची तुमची शारिरीक, मानसिक व बौद्धिक दुर्बल अवस्था लक्षात घेता ह्या उतारवयात देशात आणि देशाबाहेर स्वतःचं हस करून घेण्यापेक्षा, स्वतःची बेइज्जती करून घेण्यापेक्षा, स्वतःचा अवमान, अवहेलना आणि अवमूल्यन करून घेण्यापेक्षा तुम्ही अटल बिहारी वाजपेयींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि स्वतःहून राजसंन्यास घ्या!

महाराष्ट्रावर फार उपकार होतील!

अनंत सामंत
वसई.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.