शाळेची फी कमी होणार,राज्य शासनाचा निर्णय
मुंबई : कोरोना संसगार्मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातही काही संस्था तसेच शाळा पालकांना शैक्षणिक फी भरण्याची सक्ती करत होत्या. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने शासनाने परिपत्रक काढत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना या आणि आगामी वर्षाची शैक्षणिक फी भरण्यास सक्ती करू नये, असे आदेश दिले होते. मात्र, शासनाच्या या निर्णयाविरोधात काही खासगी संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती