ग्रामीण भागातील शाळा येत्या 26 जानेवारी पासून सुरू Schools in rural areas will start from January 26

Share This News

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १६ मार्च २0२0 पासून बंद असलेल्या शाळा आता उघडण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता ९ ते १२ वीच्या शाळा उघडल्यानंतर आता शासनाने येत्या २७ जानेवारी २0२१ पासून इयत्ता ५ ते ८ वीच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा या उघडणार असून, पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात लेखी संमती घेण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी गुरुवारला पत्रकार परिषदेतून दिली.
कुंभेजकर यांनी सांगितले की, सध्या राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. त्यानुसार शासन निर्देशान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते ८ वीच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करण्यात येईल. याशिवाय पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठविण्यासंदर्भात लेखी संमतीपत्र भरून घेतले जाणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील इयत्ता ९ ते १२ वीच्या शाळा सुरू केल्या असून, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्याही हळूहळू वाढत चालली आहे. आजघडीला ग्रामीण भागातील इयत्ता ९ ते १२ तील जवळपास एकूण विद्यार्थी संख्येच्या ३५ टक्क्यांवर विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहत आहेत. यापूर्वी ज्याप्रमाणे ९ ते १२ चे वर्ग सुरू करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवणे, स्वच्छता राखणे, शाळेचे वेळापत्रक व इतर सर्व सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या होत्याच. त्याच सूचना याही ५ ते ८ च्या वर्गासाठी कायम राहणार आहेत.
ग्रामीण भागामध्ये इयत्ता ५ ते ८ च्या १८१0 वर शाळा असून, १ लाख ५0 हजारांवर विद्यार्थी पटसंख्या आहे. तर १६ हजार १00 वर शिक्षकांची संख्या आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.