चोरीचा आरोप असलेल्या भंगार विक्रेत्याची न्यायालयात धाव Scrap dealer accused of theft runs to court

Share This News

नागपूर : चोरीचा माल लपविल्याचा आरोप करीत पाच लाख रुपयांचे स्टील जप्त करणाऱ्या नागपूर पोलिसांना न्यायालयाने भंगार विक्रेत्याविरोधात कोणत्या आधारावर आरोपपत्र दाखल केले आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. करीम पटेल आणि रज्जाक पटेल ही याचिका करणाऱ्या भंगार विक्रेत्यांची नावे आहेत.
कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या दोघांनी या आरोपपत्राला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोणत्या आधारावर आरोपपत्र दाखल केले, असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. २७ मार्च २०१५ रोजी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. आपण सगळ्या मालाच्या पावत्या सादर केल्यानंतरही खोटे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांकडून अॅड. श्रीरंग भंडारकर आणि अॅड.मनीष शुक्ला यांनी बाजू मांडली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.