नागपुरातील नैवैद्यम इस्टोरिया मंगल कार्यालय सील / Seal of Naivaidyam Istoria Mars Office in Nagpur

Share This News

नागपूर : कळमना मार्गावरील प्रशस्त नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालय नागपूर महानगरपालिकेने दहा मार्चपर्यंत सील केले आहे. या मंगलकार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सभागृहालाच सील ठोकण्यात आले आहे.
शहरातील मंगल कार्यालयांमध्ये निर्धारित परवानगीपेक्षा अधिक वऱ्हाड्यांच्या उपस्थितील विवाह सोहळ्यांचे आयोजन होत आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यांवरही महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मंगल कार्यालयांचीही तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेनुसार नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आदिवासी वसतिगृहात करण्यात आली. लकडगंज झोनच्या सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या मंगल कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. यात स्वयंपाक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या परिसराला कन्टेनमेंट (विलगीकरण) क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. मनपाच्या सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांचा मार्गदर्शनात झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी भेसारे, उपअभियंता अजय पझारे, कनिष्ठ अभियंता जगदीश बावनकुळे यांनी हे मंगल कार्यालय सील केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.