लक्ष्मीनगर येथील पिझ्झा हट याला पुढच्या सात दिवसांसाठी सील
नागपूर महानगर पालिका लक्ष्मीनगर झोन कार्यालय यांनी लक्ष्मीनगर येथील पिझ्झा हट याला पुढच्या सात दिवसांसाठी सील केला आहे. या पिझ्झा हट मधला एक कुक कोरोना पॉसिटीव्ह निघाला होता. मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार झोन चे सहाय्यक आयुक्त श्री जी एम राठोड, झोनल आरोग्य अधिकारी व इत्यादी यांनी उपरोक्त कारवाई केली. मनपा आयुक्तांनी मंगल कार्यालय आणि गर्दीच्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. नागपुरात कोरोना बाधिततांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासन अलर्ट वर आहे आणि तपासणी सुद्धा वादविण्याचे निर्देश निर्गमित करण्यात आले आहे.