दुभाजक निर्मितीचे निकृष्ट साहित्य जप्त, प्रशासकांची कारवाईने खळबळ

Share This News

औरंगाबाद, दि. 26- रस्ता दुभाजक निर्मितीसाठी सिमेंटचे ब्लॉक्स निकृष्ट दर्जाचे आढळून आले असून ते महापालिकेत जमा करून त्यांचा पंचनामा करण्याचे आदेश आज औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले. यामुळे शहरातील रस्त्यांचे कामे करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
आज लोकमत भवन पाठीमागील रस्त्यावर रस्ता दुभाजक टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी प्रशासक यांनी अचानक यावेळी भेट दिली आणि सिमेंट ब्लॉक्सच्या दर्जाची तपासणी केली. ब्लॉक्स खाली फेकल्यावर त्याचे काही भाग तुटून पडले आणि त्याच्यात क्रॅक निर्माण झाले. यावर प्रशासकांनी तीव्र प्रतिक्रिया देऊन ताबडतोब सिमेंट ब्लॉक्सने भरलेली 407 वाहन जप्त करून महापालिकेत जमा केली आणि सदरील मालाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे यांची उपस्थिती होती.
महापालिकेच्या कोणत्याही कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य किंवा निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही अशा इशारा त्यांनी यावेळी गुत्तेदारांना दिला. संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश यावेळी प्रशासक पाण्डेय यांनी दिले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.