रिक्षा चालकाच्या मुलाची ‘इस्त्रो’त ज्युनिअर सायंटिस्ट पदासाठी निवड

Share This News

ठाणे, ०४ मे, : बदलापुरमधील एका रिक्षा चालकाच्या मुलाची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. देवानंद सुरेश पाटील असे इस्त्रोत ज्युनिअर सायंटिस्ट पदासाठी निवड झालेल्या तरुणाचे नाव आहे. या यशामुळे या तरुणावर व त्याच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.देवानंद मेकॅनिकल इंजिनिअर असून सध्या तो टाटा स्टिल जमशेदपूर येथे इंजीनिअर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी देवानंदची रेल्वे लोको पायलट म्हणून निवड झाली होती. मात्र, त्याने ही नोकरी नम्रपणे नाकारली. टाटा स्टीलमध्ये नोकरी करतानाच देवानंद वेगवेगळ्या परीक्षा देत राहिला. त्यापैकीच एक असलेल्या इस्रो परीक्षेत देवानंद देशात ओबीसीमध्ये पहिला आला आणि त्याची ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. देवानंदचे वडील सुरेश पाटील हे रिक्षा चालक असून त्यांनी १२-१४ तास रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. तर, देवानंदची आई दररोज ७-८ तास पापड तयार करण्याचे काम करतात. तसेच देवानंदची एक बहीण इंजिनिअर म्हणून नोकरी करत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.