नागपुरात रेमडेसीव्हीरच्या बाटलीत पाणी भरुन विक्री

Share This News

नागपूर : रेमडेसवीरच्या बाटलीत पाणी भरुन रुग्णांच्या नातेवाईकांना विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात घडला आहे.
सक्करदरा पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. अभिलाष पेटकर आणि अनिकेत नंदेश्वर पोलीसांच्या ताब्यात असल्याचे नागपूर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी त्यांच्या कडून रिकाम्या बाटल्याही जप्त केल्या आहेत. एका नागरिकाच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर या नागरिकाने याबाबत पोलिसांनी माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून अभिलाष पेटकर आणि अनिकेत नंदेश्वर यांना ताब्यात घेतले.
नागपूर जिल्ह्यात सद्ध्या कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाने पहिल्या लाटेतील सप्टेंबरचा रेकॅार्ड तोडला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात एप्रिलच्या २० दिवसांत तब्बल १३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात औषधी आणि इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.