राजीनामा राज्यपालांकडे पाठवा : दरेकर
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीला शरण जात पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
सोशल माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दरेकर म्हणाले की, राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा मातोश्रीवर दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठविणे गरजेचे आहे. राठोड यांनी मातोश्रीवर जाऊन राजीनामा देणे म्हणजे एकाने मारल्यासारखे कराचे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे अशी टीका दरेकर यांनी केली. राठोड यांनी दिलेला राजीनामा तातडीने मंजूर करून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना केली आहे.