ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनानं निधन

Share This News

मुंबईः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आणि राज्याच्या विद्यमान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते व त्यांच्यवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.
माजी खासदार गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्यामुळे उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील वीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावंत नेते म्हणून गायकवाड यांची ओळख होती. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या गायकवाड यांनी लोकसभेच्या एका निवडणुकगीत शिवसेना नेते मनोहर जोशी यांना पराभूत केले होते. गायकवाड दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.