लस देशाबाहेरही निर्माण करण्याच्या सिरमच्या हालचाली

Share This News

पुणेः अॅस्ट्राझेनेकाची कोव्हीशिल्ड लस तयार करणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने देशाबाहेरही या लसीचे उत्पादन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात लसींचा तुटवडा पडणार नाही, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी एका मुलाखतीत याबाबतचे संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसात याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात महिन्यात लसींचे उत्पादन १०० दशलक्ष डोसपर्यंत नेण्याचे प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.