‘सीरम’च्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल: मुख्यमंत्री

Share This News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, आदर पुनावाला, सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आग कशामुळे लागली?, किती नुकसान झालं? बीसीजी लसी सुरक्षित आहेत का? आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामरांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली.

पाचजणांचा होरपळून मृत्यू

पुण्यात मांजरी येथे कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला काल गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीचा चौथा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृ्त्यू झाला होता. राम शंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतीक पाष्टे अशी मृतांची नावं असून, सर्वजण कंत्राटी कामगार होते.

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे आग भडकली

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली आणि तिथे इन्सुलिनचं भरपूर मटेरियल होतं. ज्याला ज्वलनशीलता असते. त्यामुळे ती आग वाढत गेली. महापालिकेचे 5 टँकर आणि तीन आणखी वाटर टँकर तात्काळ बोलावण्यात आले. संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे. आग विझवण्यासाठी दोन ते तीन तास लागलेत. आता पूर्णतः आग विझलेली आहे. सगळं आता नियंत्रणात आहे. संपूर्ण आग विझल्यानंतर लोकांनी आत जाऊन पाहिलं. त्या ठिकाणी पाच मृतदेह आढळून आलेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. (cm uddhav thackeray visited serum institute)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.