*शाळीग्राम*

Share This News

*विष्णूचे प्रतीक म्हणून शाळीग्रामची पूजा केली जाते.*

 नेपाळमध्ये पशुपतीनाथापासून साधारणतः १५० कि.मी. अंतरावर असलेल्या मुक्तनाथ येथे गंडकी नदीमध्ये ‘शाळीग्राम’ नावाचे दगड सापडतात. त्याशिवाय या ठिकाणी अशा दगडांचा मोठा डोंगरच असून या दगडापासून मूर्तीसुद्धा तयार करण्यात येतात तसेच या दगडांवर यंत्रे कोरण्याची प्रथाही प्रचलित आहे.

 विशिष्ट प्रकारची चक्रे आणि मुखे यावरून या दगडांची परीक्षा केली जाते. 

या दगडावर लहानशी सोन्याची रेखाही असते. 

*शाळीग्राम कसा तयार होतो याविषयी एक कल्पना सांगितली जाते, ती अशी*

हरिपर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचे एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामाचा दगड एक हजार वर्षे राहिल्यानंतर श्रीविष्णू वज्रकीर या किड्याच्या रुपाने त्यात शिरून तेथे चक्राची आकृती कोरतो. अशा

 *शाळीग्रामांचे निरनिराळे प्रकार असून त्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे*

१) शुभ्र – वासुदेव 

२) निळा -हिरण्यगर्भ 

३) काळा – विष्णू 

४) तांबडा – प्रद्युम्न 

५) गडद हिरवा – श्रीनारायण 

६) गडद निळा – नरसिंह किंवा वामन 

७) बारा चक्रे असलेल्या शाळीग्रामाला अनंत हे नाव प्राप्त झाले आहे. 

शाळीग्रामाचे असे ८९ प्रकार सांगितलेले आहेत. 

*शालिग्रामचे निरनिराळ्या प्रकारानुसार त्याचे उपयोग*

*१) वामन शाळिग्राम -*

हा छोटा आणि गोलाकार दगड असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास अहं, काम, क्रोध यासारख्या विकारांमधून मुक्ती मिळते.

*२) अनंतक शाळिग्राम -*

विविध रंग-रुप आणि ज्यावर नागाच्या फणासारखे चिन्ह असतात. या शाळिग्रामची उपासना कुटुंबाला संकटापासून वाचवणारी तसेच दरिद्रता दूर करणारी मानली गेली आहे.

*३) कृष्ण शाळिग्राम -*

गोलाकार आणि मागील भाग झुकलेला असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास श्रीकृष्णाप्रमाणे ज्ञान आणि विवेकतेच्या बळावर यश प्राप्त होते.

*४) कूर्म शाळिग्राम -*

निळा रंग, तीन रेषा आणि बिंदूने अंकित असते ही शीळा. या शाळिग्रामची पूजा शांती, धैर्य, सुख, ताकद प्रदान करणारी मानली गेली आहे.

*५) वराह शाळिग्राम शीळा -*

विषम आकार आणि मध्ये दोन चक्राचे चिन्ह असणारी ही शीळा लवकर लक्ष्य आणि कार्यसिद्धी करून देणारी आहे.

*६) ह्ययग्रीव शाळिग्राम शीळा -*

या शिळेवर पाच रेषा आणि अंकुशाचा आकार असतो. भगवान विष्णूच्या ह्ययग्रीव अवताराप्रमाणे ही शीळा संकटमोचक आहे.

*७) दामोदर शाळिग्राम -*

निळा रंग आणि यामध्ये निळ्या रंगाची चक्रकार शिळा, याच्या केवळ दर्शनाने जीवनात चमत्कारिक बदल घडून येतात

*८) लक्ष्मीनारायण शाळिग्राम -*

दोन चक्र असलेल्या या शिळेची उपासना वैभव आणि शांती प्रदान करणारी आहे.

*९) मत्स्य शाळिग्राम शिळा -*

ही शिळा कमळाच्या आकाराची असते. या शाळीग्रामची पूजा केल्याने अमाप धन, सुख व आपत्याची इच्छा पूर्ण होते.

*शाळीग्रामची पूजा कशी करावी आणि कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे -*

शुभ मुहूर्तावर घरामध्ये आपल्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारच्या एका शाळीग्रामची स्थापना करा.

 *दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करत पंचामृताने (पंचामृत म्हणजे साखर, दुध, दही, तूप आणि मध) अभिषेक करून त्यानंतर देवाची पंचोपचार (गंध, फुल, धूप-दीप, अक्षता आणि नैवेद्य) पूजा करवो. नैवेद्यामध्ये तुळस अवश्य असावी.*

 शाळीग्रामची नेहमी तुळशीसोबतच स्थापना करावी. तुळशीशिवाय शाळीग्रामची पूजा केल्यास दोष लागतो.

शाळीग्राम दुधात किंवा तांदुळात ठेवतात. तसे केल्याने जर त्याचा आकार व वजन वाढल्यास तो नित्य पूजेला योग्य समजला जातो अशी समजूत आहे.

 दक्षिणेतल्या बर्‍याच विष्णू मंदिरामधून विष्णूच्या गळ्यात शाळीग्रामांची माळ घातलेली असते. 

माध्व संप्रदायाचे वैष्णव लोक शाळीग्रामाला प्रत्यक्ष विष्णूच्या मूर्तीपेक्षाही श्रेष्ठ समजतात. पंचायतन पूजेतही विष्णूचा प्रतिनिधी म्हणून शाळीग्रामच असतो. 

माध्व लोक प्रायश्‍चितासाठी पंचगव्याऐवजी शाळीग्रामाचे तीर्थ घेतात. 

शाळीग्रामात विश्‍वातील सर्व पूज्य वस्तूंचा अंतर्भाव होतो. शाळीग्राम फुटला तरी अपूज्य ठरत नाही.

 *शाळीग्रामाची पूजा करावयाची असेल तर आधी पूर्ण माहिती करून घ्यावी.*

शालिग्राम 

★याला स्वयंभू मानले जाते.

★यांची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नसते.

★कोणताही व्यक्ती हे घरात किंवा मंदिरात स्थापित करुन पूजा करु शकतो.

*शाळीग्रामाविषयी पद्मपुराणात एक कथा सांगितली आहे ती अशी*

विष्णूने नवग्रह निर्माण केले आणि माणसाचे बरे वाईट करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले.

शनि या पापग्रहाला हे सामर्थ्य मिळताच तो ब्रह्मदेवाच्या राशीलाच गेला. ब्रह्मदेवाने त्याला विष्णूकडे पाठविले. विष्णू घाबरला आणि त्याने शनिला ‘उद्या ये’ असे सांगितले. 

दुसर्‍या दिवशी शनि गेल्यावर विष्णू जागेवर नाही. शोध घेतला असता विष्णू गंडकी शीळेचा पर्वत होऊन राहिल्याचे समजले. शनिने वज्रकीट नावाच्या किड्याचे रुप घेतले आणि पर्वताच्या पोटात शिरून पोखरू लागला. विष्णूला हे पोखरणे सहन होईना त्याच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर आल्या. त्याच पुढे कृष्ण गंडकी व श्‍वेत गंडकी म्हणून दोन नद्या झाल्या. 

बारा वर्षानंतर विष्णू शनिच्या त्रासातून मुक्त झाला. त्याने निजरुप घेतले. आपले प्रतीक म्हणून गंडकीतल्या शाळीग्रामांची लोकांनी पूजा करावी असे त्याने सांगितले.

 *येथे जाणून घ्या, शाळीग्रामशी संबंधित खास गोष्टी…*

१. ज्याठिकाणी भगवान शाळीग्रामची पूजा होते, तेथे श्रीविष्णू आणि महालक्ष्मी एकत्र निवास करतात.

२. हे स्वयंभू मानले जाते म्हणजेच यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही. कोणताही व्यक्ती देवघरात शाळीग्राम स्थापित करू शकतो.

3. शाळीग्राम वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतो. काही अंडाकार असतात तर काहींमध्ये छिद्र असते. या दगडावर (शिळा) शंख, गदा, पद्म यासारखे चिन्ह असतात.

४. शाळीग्राम पूजा तुळशीशिवाय पूर्ण मानली जात नाही. तुळस अर्पण केली तरच शाळीग्राम प्रसन्न होतात.

५. शाळीग्राम आणि भगवती स्वरूप तुळशीचे लग्न लावल्यास सर्व कलह, पाप, दुःख आणि रोग दूर होतात.

६. तुळस-शाळीग्राम विवाह केल्याने कन्यादान केल्याने पुण्य प्राप्त होते.

७. पूजा करताना शाळीग्रामला चंदन लावावे आणि तुळस अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा. हा उपाय तन, मन आणि धन सर्व अडचणी दूर करू शकतो

८. विष्णू पुराणानुसार, ज्या घरामध्ये शाळीग्राम असते ते घर तीर्थसमान मानले जाते.

९. शाळीग्राम नेपाळच्या गंडकी नदीमधून मिळतात. शाळीग्राम काळ्या रंगाचे अंडाकार दगडाप्रमाणे असतात.

१०. पूजेमध्ये शाळीग्रामला केलेल्या अभिषेकाचे पाणी स्वतःवर शिंपडल्यास तीर्थ स्नानाचे पुण्य मिळते.

११. शाळीग्रामवर नियमितपणे जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते.

१२. शाळीग्रामला अर्पण केलेले पंचामृत प्रसाद स्वरूपात सेवन केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. १३. ज्या घरामध्ये शाळीग्रामची रोज पूजा केली जाते, तेथील सर्व दोष आणि नकारात्मकता नष्ट होते.”


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.