बारावी, दहावीच्या परीक्षांच्या पेपरच्या वेळा बदलण्याची शिक्षक भारतीची शिक्षणमंत्री व गायकवाड यांच्याकडे मागणी

Share This News

मुंबई: बारावी व दहावीच्या परीक्षेच्या वेळा बदलण्यात याव्या, अशी मागणी शिक्षक भारतीने शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
23 एप्रिल व 29 एप्रिल पासून या परिक्षा सुरू होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यावर्षी एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. राज्यभर एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान 40 अंश पेक्षा जास्त असते. प्रचंड उकाड्यात पेपर लिहिताना शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या नंबर गुणांवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत सकाळी लवकर परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बारावी / दहावीच्या परीक्षांच्या पेपरची वेळ बदलण्यात यावी, अशी मागणी
शिक्षक भारती संघटनेने  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र पाठवून केली आहे.
कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी व दहावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी लवकर म्हणजे सकाळी 8 वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करण्याची विनंती या पत्राद्वारे शिक्षणमंत्र्यांना करण्यात आली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.