शिवसेनेनं इंधन दरवाढीविरोधी नौटंकी बंद करावी-देवेंद्र फडणवीस

Share This News

शिवसेनेनं इंधन दरवाडी विरोधात नौटंकी बंद करून राज्यातील पेट्रोल-डिझेल वर लागणारे कर कमी करावे मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.  सध्या पेट्रोल -डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. पेट्रोल -डिझेल वर जीएसटी नसल्याने मोठ्या प्रमाणात दरवाढ होते. तसेच राज्यात इंधनावर मोठ्या प्रमाणात कर आकारले जातात. राज्यात आमचे सरकार असताना मी व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिळून राज्यातील इंधनावरचे कर कमी केले होते. ज्यामुळे त्यावेळी पेट्रोल डिझेलचे दर हे २ रुपयांनी कमी झाले होते व राज्याचे एकही पैशाचे नुकसान झाले नव्हते. त्यामुळे आत्ताच्या सरकारने आपला नफा कमी करून ग्राहकांवरील पेट्रोल -डिझेल चा भुर्दंड कमी करावा. सोबतच शिवसेनेनं मोर्चे न काढता आम्ही जे करून दाखवले होते ते आत्ताच्या सरकारने करून दाखवावे व नौटंकी बंद करावी अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

राज्यातील ७८ लाख लोकांना वीज कनेक्शन कंपन्यांच्या नोटीस पाठवल्या आहेत त्यामुळे राज्यात मोगलाई आली आहे अशी टीकाही फडणवीस यांनी केली. वीजबिलातून जोपर्यंत हे सरकार सामान्य ग्राहकांना दिलासा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू असा इशाराही फडणवीस यांनी दिला. हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही,हिंदुत्व हे जगावं लागत ,हिंदुत्व हे केवळ भाषणातून बोलून चालत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व का सोडलं आहे एवढंच उत्तर त्यांनी द्यावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे जनाब बाळासाहेब ठाकरे होतात व शिवगान स्पर्धा बंद होऊन अजान स्पर्धा सुरु होते त्यावेळी अशा प्रकारचे वक्तव्य द्यावे लागतात अशी टीका फडणवीस यांनी केली. 

शेतकरी आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारतविरोधी वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं आता उघड झाले आहे असेही फडणवीस म्हणाले. 

चंद्रपूरच्या दारूबंदीनंतर आताच्या सरकारमध्ये चंद्रपुरात सर्वात जास्त अवैध दारू विकल्या जात असून पोलीस व प्रशासनाच्या साह्याने हे सर्व काही सुरु असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. या सरकारने दारूबंदीचा बोजवारा उडवला असून सरकारच्या आशीर्वादाने अवैध दारूचा धंदा जोरात सुरु असल्याचाही आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.  


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.