इंधन दरवाढ विरोधात शिवसेनेने काढला भजन मोर्चा

Share This News

इंधन दरवाढी विराधात रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात संपूर्ण रामटेक लोकसभा क्षेत्रात आंदोलन करण्यात आले.

क्रूड ऑइलचे दर 59 डॉलर प्रति बॅरल असून केवळ केंद्र सरकारने लावलेला अधिभार व वर्धित मूल्य यामुळे दर कमी होत नाहीत. याचा थेट परिणाम सर्व सामान्य जनतेवर पडत आहे. ही इंधन दर वाढ मागे घ्यावी यासाठी शिवसेने तर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात वाडी व हिंगणा येथे आंदोलन करण्यात आले. वाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला तर हिंगणा येथे तहसील कार्यालयात भजन मार्च काढण्यात आला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.