…तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल, शिवेंद्रराजेंचा इशारा

Share This News

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे shivendra-raje-bhosle-reaction-on-maratha-reservation

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरु आहे या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजेंनी ही भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा असंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे असं सांगत असतानाच राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करु नये असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.