धक्कादायक… एका बेडवर दोन रुग्ण, जमिनीवर झोपवून दिला जातोय ऑक्सीजन

Share This News

नागपुरातील विदारक चित्र

नागपूर : नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील विदारक स्थिती समोर आली आहे. बेड नसल्याने मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या पोर्चमध्ये जमिनीवर झोपवून ऑक्सिजन दिले जात आहे. एका बेडवर कोरोनाच्या दोन रुग्णांवर सुरु उपचार आहे. गेल्या 10 दिवसांपासून मेडिकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मेडिकलच्या बाहेरही फुटपाथवर रुग्ण झोपले. नागपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून जिल्ह्यातील व्हेंटीलेटर्स बेड संपले आहेत.
मेडिकल रुग्णालयामध्ये रुग्णांना ट्रामा केअर सेंटरच्या पोर्चमध्ये झोपवून उपचार करण्याची वेळ ओढावली आहे. तर एका बेडवर दोन दोन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. तर मेडिकल रुग्णालयाच्या बाहेर देखील रुग्ण झोपल्याचं चित्र आहे. नागपूर मेडिकल कॅालेजच्या निवासी डॅाक्टरांनी रविवारी क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार करावे लागत असल्यानं धरणे आंदोलन केलं.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.