शार्टसर्कीटने जनावरांचे गोठ्याला आग लागून मोठे नुकसान Short circuit caused great damage to the cattle shed

Share This News

कोसमतोंडी: :-सडक अर्जुनी तालुक्यातील टेमनी (हेटी) येथील टुटीराम बिसेन यांचे जनावरांचे गोठ्याला मंगळवार दि. १६ मार्चला सांय. ५ वाजेदरम्यान अचानक शार्टसर्कीटने आग लागली.शार्टसर्कीटने लागलेल्या आगीने गोठ्यात ठेवलेली तणीस व गोठ्याचा शिवार फाटा जळून खाक झाले. आग इतकी भंयकर होती की, आग विझविण्यासाठी जवळपास चार तास लागले. तेव्हा आग आटोक्यात आली.यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.शार्टसर्कीटने लागलेल्या आगीने टुटीराम बिसेन यांचे अंदाजे ७०-८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.शार्टसर्कीटने लागलेल्या आगीची माहिती तलाठी यांना देण्यात आली. तलाठी यांनी बुधवारला घटनास्थळी भेट देवून मोका पंचनामा केला.शार्टसर्कीटने गोठ्याला लागलेल्या आगीने जनावरांच्या चाऱ्याची तणीस जळून खाक झाली व शिवार फाटा पूर्णतः आगीने भस्मसात झाले.लागलेल्या आगीने टुटीराम बिसेन यांचे ७०-८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून सदर झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.