दिग्दर्शक संजय जाधवची छोट्या पडद्यावर एंट्री
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि सिनेमोटोग्राफर संजय जाधव आता मालिकेच्या पडद्यावर दिसणार आहे. ‘काय घडलं त्या’ रात्री या मराठी मालिकेत संजय जाधवचा दमदार अभिनय पहायला मिळणार आहे. या मालिकेत ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काय घडल त्या रात्री ही मराठी मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिका आता एक वेगळे वळण घेताना दिसत आहे. अँड विश्वजीत चंद्रा आणि एसीपी रेवती बोरकर मालिकेत एंट्री घेणार आहेत. विश्वजीतच्या भूमिकेत संजय जाधव दिसणार आहेत. ही मालिका फार कमी वेळात लोकांच्या पसंतीस पडली आहे. एका सुप्रसिद्ध व्यक्ती आत्महत्या करते. मात्र तपासादरम्यान हि आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात येते. या खूनामागील गूढ शोधण्याचा प्रयत्न काय घडल त्या रात्री या मालिकेतून पहायला मिळत आहे.