॥श्री गजननायमह:॥

Share This News

गावगप्पा झमेला

निवेदक : त मंडयी रामराम, हे आमचं गाव जाटवाडी बुद्रूक… घरं म्हनान गावातले त शे पाचशे. पन इतर गावयासारकंच आमचं गावबी गाव नाही रायलं. गावकी संपली अन् न कायच्या कायच्यावरुन लोक भांडा लागले. मोबाईलवर बलत राह्यतेत दूरच्यासंग न समोरच्या मानसाकडं तोंड वाकडं करुन जातेत. गावात दूध नाही भेटत पन पेट्रोल भेटते. गावात कोनाकडं का अडचन हाय, हे मालूम नसते पन किरकेटचा स्कोअर मालूम रायते. आता पाहाना एका साध्या गोठीवरुन देवीदास न परभाकरचं कसं वाजाले लागलं थे… त मंडयी, हे जाटवाडी बुद्रूक… शाळा आहे, मास्तरही… पोट्टे मात्र येत नाहीत शाळेत.

वामन : का म्हनता सरपंच साह्यब? सकायी सकायी कुठी निंघाले बॉ?
सरपंच : बहीन हटकलं? अबे, ग‘ाम सोच्छता अभियानाची मिटींग हाय

तालुक्याले. या वक्ती आपला गाव पहीला आला पाह्यजेन…

निवेदक : (हसतो) तर हे सोच्छता गावची… नाल्या, उकिरडे अन् सकायी हाती
लोटा घेऊन येनारे झडकरी…
देवीदास : का वामन्या? वाह्यतीचे काम झाले का नाही सुरू?
वामन : देवीदासभौ, कसी व्हाची नांगरनी?
देवीदास : कामून? बैल देत नाही वाटलं का म्या? जादा पैसे ना घेनारऽऽ
इतरायसारके… परभाकर भौऽऽ
(तिथून प्रभाकर जातो. याच्या टाँटने तो थांबतो.)

प्रभाकर : जयतेत रे लोकऽऽ वामन्या जयतेतऽऽ आपून नाई गिनत अस्यायले…

निवेदक : हे देवीदास अन् वामन… दोघांचं राजकीय, जातीय, गावकीतलं… ज्या
ज्या प्रकारचं भांडन असू शकतं तसं भांडन हाय… सरपंच आमदार गटाचा आहे अन्
राखीव कोट्यातून सरपंच झाला आहे. बाकी गाव आबादी आबाद हाय गावात
कायलेच काही कमी नाही ना..
शंकर : काय म्हनत मारत्या? गारपीटीचे पैसे भेटले म्हने तुले…
मारोती : होव, भेटले ना बा भेटलाना आखरीले…

वामन : मंग? सांजच्यालेऽऽ आंधया बुधा बुड्याचं तीर्थ घेऊ…

निवेदक : हा आंधया बुधा पण आहेच चोवीस तास सेवेसाठी… मग गावात धिंगाणा

होणारच नाही?

दृष्य 2
निवेदक : त्या दिसी का झालं ते पाहा…
(आठ- दहा लोक हातात लाठ्या- काठ्या घेऊन बेगुमान धावत सुटलेले आहेत.
शिकारी हाकारा करतात तसे… जोरजोराने ओरडत, ‘पकडा सायाच्याले’ ‘आजत
सायाच्याचा हेलाच पाडू…’ ‘मायला नेओ लयच माजला ना…’ त्यांच्या समोर त्यांचा
नेता ग‘ाम पंचायतचा मेंबर परभाकर…
प्रभाकर : बहीनमायचा कुठी गेला रे?
वामन : भाऊ, देवीदासच्या घरात घुसल्यावानी वाटते मले…
प्रभाकर : बहीन अठीच लपाचं व्हतं का त्याले? चाला अज त सोडाचंच नाई
सायाच्याले… मुडदाच पाडू.
(देवीदासच्या अंगणात शिरतात. दुपारची वेळ तो झोपलाय. दार बंद आहे. दार
वाजविल्याचा आवाज.)
प्रभाकर : काढ सायाच्याले बाह्यर… (देवीदास दार उघडतो. तोही आक‘मकच)
देवीदास : का व्हय? लय मस्ती आली का?
वामन : देवीदासभौ, आयकून त घे…
देवीदास : तुमी ब‘म घेऊन यान घरावर न मी आयकून घेऊ?

देवीदासची बायको : मांग व्हा, म्या का म्हनतो…
देवीदास : थांब व तूऽऽ हात नाही गेले माहे…
प्रभाकर : नाही आमचे गेले… हे पाह्य, त्याले बाह्यर काढं…
बायको : माह्यावर काहाले वरडून रायले… बाईमानसाचीबी सुद नाई रायली
तुमाले.?
देवीदास : आता बाईमानसालेबी धमक्या द्या लागला तू? मारतं का मले?
(तो बाहेर येतो. बाचाबाची वाढते. तोवर शंकर, हरीराम आणखी काही देवीदास
गटाचे येतात त्यामुळे त्यालाही जोर चढतो.)
प्रभाकर : तुले नाही, त्याले बाहेर काढ… शंकर्‍या तू बाजुले व्हय.
शंकर : हातात काड्या घेऊन घरावर याचं न…
मारुती : लयच माजले ग‘ामसेवक झालेत…
(हमरीतुमरीवर येतात. आवाज वाढतात. कोण काय म्हणतंय हेच कळत नाही.
गावातले काही बुढे येतात. बघे देखील. तंटा सोडवितात. धुसफुसत शांत होतात.)
तुकाराम आबा : असे भांडता लेकहो…
देवीदास : तुकाराम आबा, म्या का केलं? म्या त झपलो व्हतो घरात, या
परभाकरच आला चालून घरावर. संग हे मानसंबी…
शंकर : देवीदासले त्यानं पाडलं विलेक्शनमंधी, म्हून का इतलं इतराचं का?
(तितक्यात आले, आले असा गलका होतो. सगळे बघतात तर सरपंच आलेले.)
तुकाराम : थांबा, आता सरपंच आले, थेच सांगतीन का खरं न का खोटं थे.
प्रभाकर : या सरपंच तुमीच पहा, खर्‍याची काही दुनियाच नाही रायली. म्या काई
येच्यावर चाल करुन नाही गेलो.
सरपंच : मले जरा शांतीन सांगा का झालं थे…
(परत गलका होतो. प्रत्येकजण आपली बाजु जोरकस मांडू लागतो.) गप्पऽऽ,
गपचाप राहा… कोंबड्यायवानी फडफड करतेते बटे. तठी मी गराम पंचायतमंध वाट
पाह्यत तुमची.
वामन : कहाले सरपंच?

सरपंच : गावची जुनी यात्रा, ते सुरू कराची. तेच्यासाटी लय काम कराचे. पह्यलं
काम का पक्की सडक कराची…
प्रभाकर : कुठून जाइन म्हनलं सडक?
वामन : हे अठून निंघन, नदीच्या त्या आंगानं ईठाबाईच्या समाधीकून सिद्धी
गावातल्य वडाच्या झाळाजोळून पाराकडं न मंग लागन वर्धा रोडले. सारा गाव
कव्हर व्हते.
प्रभाकर : तसीच कामून? मारोतीच्या पाराकून नेता येते…
देवीदास : म्हंजे ‘आमच्या’ घराकून जाते ना सडकऽऽ
प्रभाकर : खरंत विलेक्शनमंध हरलेल्या लोकायनं गराम पंचायतच्या कामात
बलालेच नाई पायजेन…
देवीदास : अबे माह्या ईरोधात तू कसा जितला माहीत हाय ना… जातीयवाद
करतेत सालेऽऽ
प्रभाकर : हानाच लागते भोसडीच्यायले…
शंकर : शिव्या देन्याचं काम नाई, घरावर चालून येता तुमी?
वामन : कुत्र्याच्या मांग लागलो व्हतो आमी… चावरं कुत्रं!
देवीदास : सरपंच समजवा यायले, कुत्रं म्हनत हाय थो वामन्या…
प्रभाकर : बराबर बोल बेऽऽ
(परत भिडतात. सरपंच मध्ये पडतो.)
सरपंच : जत्रा भरवाची, सडक कराची…
प्रभाकर : यायले सांगा… कुठीबी खुटी उपाड धंदे करतेत.
सरपंच : गेला कायले त्याच्या घरावर चाल करुन?
प्रभाकर : या शंकरमामाचं कुत्रं माह्या वार्डात चावलं चार झनायले. तेच्या मांग
लागलो व्हतो, ते येच्या घरात घुसलं…
देवीदास : हे सांगलं का तुनं? आता कारन बनवत हाय त…
वामन : आता कोनालेबी इचार ना… शंकर मामाले इचार…
सरपंच : सडक?

प्रभाकर : सडक कसी होइन थे गरामपंचायतच्या मिटींगमंध ठरन… पह्यले त्या
कुत्र्यायचा बंदोबस्त कराचा हाय.
देवीदासची बायको : आता नेते लोक कुत्रे मार हिंडा लागले गावात… सिद्धं सांगाचं
ना का जुना डाव साधाले आलतो म्हून.
वामन : देवीदास, बायकोले आवर… भाऊवर काहीबी आरोप करत हाय थे.
देवीदास : कुत्रा कुठीच दिसत नाही न तुमी कुत्र्यामांग आले म्हने… काव मामी,
तुमचं कुत्रं चावरं झालं म्हने.
मामी : परभाकर आपल्या हिर्‍याच्याच मांग लागला हाय.
मामा : आता चावलाच म्हनते आपला हिर्‍या तेच्या वार्डात…
मामी : आपला हिर्‍याच चावला कस्यावरुन? न कुत्राच ना थो? मांग थ्या
चौधर्‍याचं कुत्रं चावलं तवा नाही धावला परभाकर… आपल्या जातीच्या लोकायवर
त्याचा कुर्राच हाय. राजकारन हाय हे… नाव कुत्र्याचं न घाव देवीदासवर. कुत्राबी
आपलाच सापडला त्याले. आज कुत्रा, उद्या तुमी…
मामा : बहीनऽऽ हात त लाव म्हना…
मामी : लावनऽऽ लावन एकदिस… आज कुत्र्यावर धावाला उद्या मानसायलेबी…
प्रभाकर : पुना पुना थोच इसय काढाचं काही कारन नाही.
मारुती : दुसरा इसय काढ ना शेंडे मामा…
सरपंच : मी का म्हनतो का जरा थांबान?
वामन : हो, आता थो बी तुमच्याच समाजवाला हाय ना… आमदारानं सारे आपले
मानसं भरले.
सरपंच : त्यायले कायले आनता मंध? प्रभाकरले समजावतो म्या…
देवीदास : दोनी डगरीवर पाय ठेऊ नका, पडान… कुत्रे मारत फिरतेत गावात,
गावाच्या इकासच्या गोठी कराच्या त कुत्रे मारतेत.
प्रभाकर : मानसंबी मारू शकतो…
शंकरमामा : हात लाव… एक सांगतो का आमच्या समाजाच्या लोकायवर जादाच
कुर्रा ठेवतं तू…
प्रभाकर : जातीयवादी म्हनतं का मले?

मारुती : तुमची जमातच…
(परत गोंधळ. आता मारामारीच सुरू होणार.)
सरपंच : अबे गप्पऽऽऽ गपचाप राहाऽऽ मानसासारके मानसं न कोंबड्यायवानी
झुंजतेत बटे. (जिप गाडी थांबल्याचा आवाज) कोनतबी आलं, आता तबी चुप
राह्यता?
जनार्दन : रामराम, सरपंच तुमीच का या गावचे?
सरपंच : हो…
जनार्दन : का झालं इतला तनाव कायले गावात?
सरपंच : आता का सांगाव? तसं इतलं होन्यासारकं काहीच झालं नोतं…
देवीबायको : कुत्रं माराचं म्हून हे आमच्या घरावर चालून आले.
वामन : नाही, आमी कुत्र्याच्या मांगच आलतो. चावरं कुत्रं हाय शंकर मामाचं.
मामी : आमच्याच कुत्र्यावर डोया यायचा. जातीयवाद हाय येच्यात…
जनार्दन : कुत्रं कोनाचं, चावलं कोनाले, माराले धावलं कोन न त्याले गावलं कोन?
आता कुत्रंबी कोन्या जातीच्या घरचं तेच्यावरुन कुत्र्याचीची जात करता तुमी?
सरपंच : नाही, थे जत्रेचंबी…
जनार्दन : जत्रा… जत्रामे फतरा बिठाया न तिरथ बनाया पानी… जत्रेत कोंबडे
कापता कापता तुमी मानसंबी कापा लागले का?
सरपंच : तुमी पाटील म्हनजे? म्हनजे…
जनार्दन : कोन्या समाजाचे? असंच ना? गावातले सारेच असीन समजदार मानसं
अठी त काही बलाचं व्हतं…
सरपंच : सारेच त हायत.
जनार्दन : सारेच आले पन एकजन नाही…
शंकर : कोन?
जनार्दन : तुमचा कुत्रा… (सगळे हसतात.) बाप्पा हासता कायले? त्याच्यापाईच त
तुमी डोस्के फोडून घेतले ना? बरं भांडन कायले झालं? कारन का, हे कोनालेच
नाही सांगता येत. तरीबी तुमी भांडता. मारामार्‍या करता. तुमच्या इतले हुशार
मानसं त म्या पंचक‘ोशीत नाही पाह्यले राजेहो. भेटलं का? त जखमा…

मामा : सवाल समाजाचा व्हता… आमच्या समाजाच्या मानसावर धावून
जानार्‍याचे हात तोडू ना आमी…
जनार्दन : तुमचा समाज कोन्ता?
मामा : आमी शेंडे…
जनार्दन : किती हायत तुमच्या समाजाचे?
(लोक उभे राहतात.) हं, लय हाय. दोनशे साल पह्यले तुमी कोन व्हते?
मारुती : तवाबी आमचा समाज व्हता ना… शिवाजी महाराजाच्या कायात म्हने
आमी तेलक री व्हतो.
जनार्दन : त्याच्या आदी?
शंकरमामा : तवाबी व्हतीच आमची जात…
जनार्दन : हजारक सालापयले? जंगलातून फिरत व्हता मानूस तवा जात होती का
तुमची? व्हते का तवा शेंडे? (सगळे माना खाली घालतात.) तवा नोती जात… तवा
सारेच मानसं व्हते. आता गावात आले. नागरीकरन झालं न तुमाले जात दिसली?
मंग त जंगली अवस्थेत मानसात व्हते तुमी. न कारे परभाकर, मेला मानूस त
त्याच्या मुडद्याची जात असते? धरम असते त्याचा? बहीन भांडी नका रे, अशानं
गावाचा बेंदाफाक व्हत हाय. ठरुन टाका भांडाचं नाही. तंटे नको गावात. शांतात
राह्यली का ईकास व्हते गावाचा… तुमी भांडत असतानी कुत्रं का करत व्हतं मालूम
हाय? शंकर मामाचा हिर्‍या परभाकरच्या कुत्रीसंग व्हलेंटाईन डे मनवत व्हता. थे
कुत्रे असून प्रेम करतेत अन् तुमी मानसं असून भांडता?
सगळे : आजपासून आमी सारेच करू हेलेंटाईन डे…!
(सगळे हसतात)

  • कौतिकराव

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.