कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून धनादेश सुपूर्द.

Share This News


पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

मुंबई, ६ नोव्हेंबर : पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी आज केले. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून मदत करण्यात आली.
कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले.या खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  मंत्रालयातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या तसेच नातेवाईक उपस्थित नसलेल्या पत्रकार बांधवांचे चेक पत्रकार संघटनाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार स्व.जयंत करजवकर, News 18 लोकमतच्या मुंबई कार्यालयात काम करणारे पत्रकार स्व.विठ्ठल मांजरेकर, तसेच संभाजीनगर येथील सामनाचे पत्रकार स्व. राहुल डोलारे यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. 
यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप सपाटे, उपाध्यक्ष श्री दीपक भातुसे, माजी कार्यवाह श्री प्रमोद डोईफोडे, श्री सोनू श्रीवास्तव तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी श्री मयुरेश गणपते, श्री राजू सोनवणे आदि उपस्थित होते.तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे हे देखील उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.