अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेणार श्रीपाद नाईक Shripad Naik will participate in the budget session

Share This News

नवी दिल्ली: जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री  आणि जेष्ठ भाजप नेते श्रीपाद नाईक अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेण्यासाठी  रविवारी दिल्लीला रवाना झाले. या संदर्भात त्यांच्या कार्यालयाने अधिकृत माहिती दिली.  24 फेब्रुवारीला पणजीच्या  गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु असून  8 एप्रिल पर्यंत चालणार आहे. पहिला भाग 13 फेब्रुवारीला समाप्त झाला.

फेब्रुवारी महिन्यात माध्यमांशी संवाद साधत अपघाताचा अनुभव सांगताना श्रीपाद नाईक म्हणाले होते,  ” 11 जानेवारीचा अपघात इतका  तीव्र आणि  धक्कादायक होता की, मला काहीच समजले नाही. सगळ्यांनी केलेल्या मतदीसाठी धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी विचारपूस केली आणि उत्तम प्रकारे बरे होण्यास सांगितले. ते म्हणाले की, पुन्हा एकदा  मंत्रालयाचा कार्यभार देण्यात येईल. चिकित्सकांनी परवानगी दिल्यास दिल्लीत संसदेच्या अधिवेशनात जाईल. “

11 जानेवारी रोजी  श्रीपाद नाईक आणि त्यांच्या पत्नी विजया तसेच स्वीय सचिवांचा कर्नाटकमध्ये प्रवासादरम्यान अपघात झाला ज्यात श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले मात्र त्यांच्या पत्नी विजया तसेच स्वीय सचिवांना प्राण गमवावे लागले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी,  संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला आणि आवश्यक माहिती घेतली होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.