अँटिलिया प्रकरणाचे तपास अधिकारी शुक्लांची तडकाफडकी यांची बदली

Share This News

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था ( एनआयए ) चौकशी करत असून या तपास पथकाचे नेतृत्व करत असलेले महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे वृत्त आहे. अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करून त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटके आणि स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरन हत्येप्रकरणी एनआयए मार्फत तपास सुरू आहे. याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत राहिलेले व सध्या निलंबित असलेले सचिन वाझे यांना अटक केली आहे. याप्रकरणी तपासाला वेग आला असून वाझे यांचे सहकारी रियाज काझी यांनाही अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे तर निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावरही एनआयए टीमकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. हा तपास सध्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर असतानाच अनिल शुक्ला यांच्या बदलीचे वृत्त येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.