कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; रिकव्हरी रेट ९४.८६ टक्के

Share This News

नवी दिल्ली
सोमवारला राज्यात १ हजार ९२४ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून ३५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून वाढत असताना आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार फक्त १ हजार ९२४ रुग्ण सापडले आहेत. इतक्या कमी संख्येनं रुग्ण आढळल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १९ लाख ९२ हजार ६८३ इतकी झाली आहे.सोमवारला राज्यात ३ हजार ८५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजपयर्ंत राज्यात १८,९0,३२३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण वाढीचा दर ९४.८६% टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात सध्या ५0 हजार ६८0 अँक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.