सिंधुदुर्ग वनसाईड मारले, आम्हीच सर्वात मोठा पक्ष, आतातरी शिवसेनेने स्वत:ची इज्जत वाचवावी : देवेंद्र फडणवीस
महाविकासआघाडी एकत्र राहिली तरीही भाजपच एक नंबर ठरेल’
ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांनी आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले मतदान केले. आम्ही दोन-अडीच वर्षे सातत्याने काम केले तर भाजप राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल. यावेळी फडणवीस यांनी खानापूर ग्रामपंचायतीमधील पराभवामुळे लक्ष्य करण्यात येणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची पाठराखणही केली. एखादी ग्रामपंचायत आली किंवा गेली तर त्यासाठी नेते जबाबदार नसतात. महाविकासआघाडीने चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करुनही पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे यश मिळाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आतातरी शिवसेनेने स्वत:ची इज्जत वाचवावी: फडणवीस
पश्चिम बंगाल निवडणूक शिवसेनेनं लढवण्याची घोषणा केलीय. त्यावरून आता राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतर शिवसेनेला अक्कल आली पाहिजे होती. मात्र, आता पुन्हा ते पश्चिम बंगालमध्ये उमेदवार उभे करत आहेत. तेथेदेखील हीच गत होईल. किमान आतातरी शिवसेनेनं आपली इज्जत आपणच राखावी, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला
भाजपने राज्यातील सर्वच भागांमध्ये यश मिळवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकासआघाडीला मागे टाकून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. विधानपरिषद निवडणुकीतील पराभव हा तात्पुरता होता. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांची राजकीय स्पेस कमी झाली आहे. ही स्पेस भाजपने व्यापल्यामुळे आमच्या पक्षाचा या निवडणुकीत विस्तारच झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
ते सोमवारी मुंबई ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी 50 टक्के ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा विजय होईल, असे सांगितले. राज्यात निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टी झाली तेव्हा खूप घोषणा झाल्या. पण प्रत्यक्षात मदत काहीच मिळाली नाही. त्यावेळी मोदी सरकारने महाराष्ट्राला मदत दिली. पण राज्य सरकारने काहीच दिलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्याचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला, असे फडणवीस यांनी म्हटले.