गायकाने फेसबूकवर लाईव्ह केला आत्महत्येचा प्रयत्न Singer attempted suicide live on Facebook

Share This News

आर्थिक परिस्थितीमुळे उचलले पाऊल
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली. अशातच शहरातील एका गायक कलाकाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याने ही घटना फेसबूकवर लाईव्ह केली. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले.
शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. पारडी येथील रहिवासी प्रवीण मून या ३५ वर्ष वयोगटातील गायकाने हाताची नस कापून घेतली. हा सगळा प्रकार त्याने फेसबूकवर लाईव्ह केला. या घटनेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ही घतना घडली त्यावेळी त्याची मुलगी आणि पत्नी रडत होती. फेसबूकवर लाईव्ह स्ट्रिमिंग बघून त्याच्या मित्रांनी पारडी येथील त्याचे घर गाठले आणि त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कला क्षेत्रातील लोकांची अडचण लक्षात घेऊन एक प्रतिनिमंडल जिल्हाधिकारी, महापौर व पालकमंत्र्यांना भेटले होते. मात्र, त्यांची निराशाच झाली. प्रवीण देखील अस्वस्थ होता, असे त्याच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.