तर पीपीई किटमध्ये द्यावी लागणार एमपीएससी परीक्षा So MPSC exam has to be given in PPE kit

Share This News

नागपूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात शुक्रवार, १९ मार्चला आयोगाने कोरोनाच्या अनुषंगाने दिशादिर्शेश जाहीर केले आहेत. आठ मुद्द्यांवर काढण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनांचे पालन प्रत्येकाला करावे लागणार आहे.
एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. रस्त्यांवर उतरून आंदोलनही केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याच दिवशी सायंकाळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून परीक्षार्थींना संबोधित करावे लागले होते. त्यानंतर आता रविवार, २१ मार्चला ही परीक्षा होत आहे. त्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने काही दिशानिर्देश दिले आहेत.

असे आहेत दिशानिर्देश

  • विद्यार्थ्यांना तीन लेअर असलेले मास्क वापरावे लागणार.
  • मास्क, हातमोजे, सॅनिटायजरच्या किट सोबत ठेवाव्या लागणार.
  • हात सतत सॅनिटाइज करावे लागणार.
  • कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्यांची परीक्षा वेगळ्या कक्षात होणार.
  • ताप, सर्दी खोकला आदी असलेल्यांना परीक्षा अधिकाऱ्यांना कळवावे लागणार.
  • लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना पीपीई किट, फेसशिल्ड घालून परीक्षा द्यावी लागणार.
  • वापरलेले टिश्यू पेपर आदी सुरक्षितपणे फेकणे बंधनकारक राहणार.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.