.. तर कोवॅक्सिन लस घेऊ नये

Share This News

नवी दिल्ली
कोवॅक्सीनच्या प्रतिकूल परिणामांबद्दल म्हणजेच साइड इफेक्टबद्दल बोलताना भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी म्हटले आहे की कोणालाही इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती संदर्भातील समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषध सुरु असतील तर त्यांनी सध्या कोवॅक्सीन घेऊ नये. भारत बायोटेकने कोवॅक्सीनसंदभार्तील सर्व शंका दूर करण्यासाठी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये यासंदभार्तील माहिती दिली आहे.
भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणार्‍या कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन ही २00 टक्के सुरक्षित असल्याचे म्हटले होते. आम्हाला लस बनवण्याचा अनुभव असून आम्ही सर्व वैज्ञानिकांचे सल्ले गांभीयार्ने घेतो, असेही कृष्णा म्हणाले होते. भारत बायोटेकच्या करोनावरील कोवॅक्सीन या लसीला ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआयने आप्ताकालीन वापरासाठी परवानगी दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याचे पहायला मिळाले. या लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदभार्तील पारदर्शकतेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यापूर्वी सरकारने इम्यूनो सप्रेसेंट किंवा इम्यूनो डेफिशिएन्सी असणार्‍या व्यक्तींनाही कोवॅक्सीने घेता येईल असे म्हटले होते. मात्र चाचण्यांदरम्यान अशा व्यक्तींवर करोनाची लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आले. सामान्यपणे केमोथेरपी करणारे कॅन्सरचे रुग्ण, एचआयव्हीचा संसर्ग झालेले रुग्ण आणि स्टेरॉइडचे सेवन करणारे इम्यूनो-सप्रेस्ड असतात. म्हणजेच अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.