समाज कल्याण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
नागपूर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.अनिल वाळके असे या ५६ वर्षीय समाज केल्याने अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे नागपूरच्या विशेष निवासी शाळेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विशेष निवासी शाळा येथे गेल्या एक वर्षांपासून कार्यरत आहेत. एक वर्षाचा परिवीक्षाधिन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या नियुक्तीसाठी कायमस्वरूपी पद मान्यता करण्याकरिता संस्थेने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. परंतु १३३ दिवसानंतर हा प्रस्ताव तृतीयांसह परत पाठवण्यात आला. त्रुटींची पूर्तता केल्यावरही हा प्रस्ताव समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला नव्हता. हा प्रस्ताव उपायुक्त कार्यालयाकडे पाठवण्यासाठी अनिल वाळके यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. या बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यावर गुरुवारी अनिल वाळके यांना ५० हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. वाळके यांच्याविरुद्ध सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपस करीत आहेत.