सोलापूर : लसीकरणाचा वेग वाढला, तीन हजारांपेक्षा जास्त डोस

Share This News

सोलापूर 23 एप्रिल शहरात कोरोना प्रतिबंधक लसचा वेग वाढला असून, बुधवारी ३ हजार ३७ जणांना लस देण्यात अाले. त्यात महापालिका केंद्रावर २३६७ तर खासगी दवाखान्यात ६७० जणांना लस देण्यात आले.महापालिकेकडील साठा संपला असून, गुरुवारी सकाळी लस मिळल्यानंतर लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. 
आतापर्यंत पहिला डोस २२ हजार ६ जणांना देण्यात आले. त्यात आरोग्य विभागातील ११ हजार ५४३ तर फ्रंट लाइनमधील १० हजार ४६३ जणांना देण्यात आले. आरोग्य विभागातील ६ हजार १३२ जणांना दुसरा डोस देण्यात आले तर फ्रंट लाइनमधील ५ हजार ९९० जणांना दुसरा डाेस देण्यात आले.३० हजार ७२१ ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात अाले. त्यात पहिला डोस २७ हजार ४६० तर दुसरा डाेस ३ हजार २६१ जणांना देण्यात आले. ४५ वर्षावरील आजार असलेले १३ हजार ४४० जणांना लस देण्यात आले. शहरात एकूण ९४ हजार ८८१ जणांना लस देण्यात अाले. बुधवारी ३ हजार ३७ जणांना लस देण्यात आले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.