अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके नागपुरातील |Solar company’s gelatin used to threatening Ambani

Share This News

नागपूर, 26 फेब्रुवारी : उद्योपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गुरुवारी स्फोटके आढळून आली होती. ही स्फोटके नागपुरातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती पुढे आलीय. सोलर एक्स्प्लोसिव्ह ही सत्यनारायण नुवाल यांच्या मालकिची असून जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. मुंबईतील पेडररोड परिसरात अंबानी यांचे अँटेलिया हे निवासस्थान असून हा परिसर उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. या भागात कायम महागड्या लक्झरी वाहनाची ये-जा सुरू असते. परंतु, या भागात स्कॉर्पिओ कार पार्क झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांना या वाहनाचा संशय आला. दरम्यान वाहनाची तपासणी केली असता त्यात जिलेटीनच्या 25 कांड्या आढळून आल्या होत्या. ही स्फोटके नागपुरातील सोलर एक्स्प्लोसिव्ह कंपनीतील असल्याची मोहिती पोलिस चौकशीत पुढे आली. यासंदर्भात पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर सोलर कंपनीत फोन करून चौकशी केली. यासंदर्भात सोलर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबानी यांच्या घराबाहेर आढलून आलेली स्फोटके विहीर खोदणे आणि खाण कामासाठी वापरली जातात. दरम्यान  स्फोटके नेमकी कुणाला विकली होती याची माहिती देण्यास कंपनीने असमर्थता दर्शवली आहे. अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटके सोलर कंपनीतील असल्याची माहिती पुढे आल्यानंतर सोलर एक्स्प्लोसिव्ह कंपनीने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले. त्यात नमूद केल्यानुसार सोलर कंपनी स्फोटक निर्मीती आणि विक्रीसंदर्भात केंद्र सरकारने 2008 मध्ये बनवलेल्या नियमांचे काटेकोर पालन करते. स्फोटकांच्या पेटीवर मॅनिफॅक्चरिंग क्रमांक आणि बारकोड नमूद असतो. परंतु, जिलेटीनच्या सुट्या कांड्यावर कसलीही माहिती किंवा संकेतांक अंकित नसतो. त्यामुळे अंबनीच्या घराबाहेरील वाहनात आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्या नेमक्या कधी आणि कुणाला विकल्या होत्या हे सांगण्यास कंपनी असमर्थ ठरली. दरम्यान डिटोनेटरच्या मदतीविना ही स्फोटके निरुपयोगी असल्याचे सुतोवाचही कंपनीकडून करण्यात आले. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.