माजी अटर्नी जनरल पद्मविभूषण सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन

Share This News

नवी दिल्ली, 30 एप्रिल : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि देशाचे माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दक्षिण दिल्लीमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोली सोराबजी यांनी 1953 मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिली क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर 1971 साली त्यांची सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर 1989-90 मध्ये ते भारताचे ऍटर्नी जनरलपदी नियुक्त झाले. यानंतर 1998 ते 2004 या काळातही ते देशाचे ऍटर्नी जनरल होते. त्याचप्रमाणे 1997 साली नायजेरियासाठी सोराबजी यांची संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. मार्च 2002 मध्ये त्यांनी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.