नागपुरात क्राइम ब्रांच अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू Son of a crime branch officer dies in Nagpur

Share This News

नागपूर : धंतोली परिसरात असलेल्या फॉर्च्युन मॉलच्या पार्किंगमध्ये नागपुरात क्राइम ब्रांच अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतेदह आढळल्याचे शुक्रवार, १९ मार्चला खळबळ उडाली. अभिषेक बघेल (वय २६) हे मृतक तरुणाचे नाव आहे. अभिषेकचे वडिल नरेंद्र बघेल स्थानिक गुन्हे शाखेत पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.
फॉर्च्युन मॉलमध्ये कार्यरत काही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सकाळी अभिषेकचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनिता साहू, सीताबर्डी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल सबनीस फॉर्च्युन मॉलच्या पार्किंगमध्ये दाखल झालेत. अधिकाऱ्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक दोन दिवसांपासून घरी नव्हता. त्याच्या शरीरावर कोणतीही जखम आढळली नाही. त्याला मिर्गीचा त्रास होता. फॉर्च्युन मॉलच्या पार्किंगमध्ये असताना त्याला मिर्गीचा झटका आला असावा व त्यामुळे त्याची दुचाकी बेसमेंटच्या पीलरवर आदळली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात पोलिसांनी अकस्मात मृ्त्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.