नियमित तपासणीसाठी सौरव गांगुली रुग्णालयात दाखल; रुग्णालयाकडून स्पष्टीकरण

Share This News

कोलकाता, २८ जानेवारी,: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे फक्त  नियमित तपासणीसाठी  रुग्णालयात दाखल झाले होते असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 
 बुधवारी सौरव गांगुली यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 दरम्यान २ जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.