मध्य रेल्वे नागपूर मंडळाची विशेष पार्सल सेवा
मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्यावतीने दिल्लीसाठी पहिल्यांदाच दररोजची पार्सल सेवा सुरू केली आहे. या सेवेंतर्गत पार्सल पाठविणे आणि परत मागविणे सहज होणार आहे. २0 नोव्हेंबरपासून ही विशेष पार्सल सेवा सुरू करण्यात आली आहे.
२३ टन क्षमता असलेली पार्सलबोगी दररोज नागपूर पार्सल येथे उपल्बध राहणार आहे. तीच बोगी रात्री पार्सल स्पेशल क्रमांक 00७६१ रेनीगुंटा ते निजामुद्दीनमध्ये जोडण्यात येऊन रात्री १२.५५ ला रवाना होईल. ही पार्सल स्पेशल गाडी बैतुल, इटारसी, भोपाल, झांशी आणि आग्रा येथे थांबत त्याच दिवशी सायंकाळी ५.२0 वाजताच्या सुमारास निजामुद्दीनला पोहचणार आहे. याच प्रकारे पार्सलबोगी परतीचा प्रवास करणार आहे. निजामुद्दीनपासून बुक करण्यात आलेले पार्सल घेऊन पार्सल स्पेशल 00७६२ सकाळी १0.१५ वाजता निघेल आणि त्याच रात्री १0.१५ वाजताच्या सुमारास नागपुरात पोहचणार आहे. दोन्ही पार्सल सुविधा दररोज उपलब्ध राहणार आहेत. नागपूर मंडळातून ही सेवा सुरू झाल्यापासून ३ दिवसात ८७६ पॅकेज (३३५.६३ क्वि.) पाठविण्यात आले आहेत. या सेवेमुळे १,0२,३७२ रुपयांची कमाई झाली आहे. याआधी नागपूर मंडळाने कोलकातासाठी (शालीमार) २ लिंक पार्सलबोगी सुरू केली होती. त्याची क्षमता ४६ टनपासून सुरू होत आहे. ती पार्सल स्पेशल क्र. 00११३ मुंबई शालीमारमध्ये नागपूरपासून जुळत होती. ती गाडी दररोज २.४५ वाजता रवाना होऊन कोलकाता येथे सकाळी ११.३५ वाजता पोहचते. परतीच्या प्रवासात ही पार्सलबोगी स्पेशल 00११४ शालीमार मुंबई येथे लागून रात्री ९.२५ ला निघते आणि नागपुरात दुसर्या दिवशी सायंकाळी ७.३0 वाजता पोहचते. ही स्पेशल गाडी गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगडा, राऊलकेला, टाटानगर आणि खडकपूर येथे थांबते. नागपूर मंडळाने सर्व प्रकारच्या फळ आणि भाजी विक्रेते आणि व्यापार्यांना या पार्सलबोगींचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक मािहतीसाठी मुख्य पार्सल पर्यवेक्षक नागपूर आणि मार्केटिंग इन्स्पेक्टर नागपूर यांच्याशी संपर्क करावा.