भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली खास टेक्नोलॉजी; हवेतच कोरोना व्हायरस मारला जाणार Special technology developed by Indian scientists; The corona virus will be killed in the air

Share This News

कोरोना व्हायरसची (CoronaVirus) माहामारी नष्ट करण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान एक वेगळी टेक्नोलॉजी विकसित केली जात आहे. भारतीय वैज्ञानिकांनी  हे खास तंत्र विकसित केलं आहे. यामुळे वातानुकुलित खोलीतील कोरोना व्हायरसला मारून हवा सुरक्षित बनवता येऊ शकते.  केरळमधील राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी (RGCB certifies aerolyz ) नं हे खास टेक्नोलॉजी एयरोलाइज बनवलं आहे. हे एक विषाणूनाशक पेटंट आहे. जे बंद वातानुकुलित वातावरणातील कोरोना व्हायरससला मारून हवेला १०० टक्के शुद्ध बनवते. राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (आरजीसीबी) ही भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागांतर्गत एक राष्ट्रीय स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने ‘एरोलाइज’ चे प्रमाणपत्रही दिले आहे. याद्वारे हानिकारक व्हायरस फिल्टर आणि संग्रहित होत नाही, परंतु त्यांना हवेमध्ये मारले जातात. अहवालानुसार या विशिष्ट तंत्रज्ञानाची कार्यक्षमता तपासण्यासाठी इन्फ्लूएंझा ए, २०० H एच 1 एन 1-स्वाइन फ्लू, कोरोना व्हायरस ई जीन्स आणि कोरोना व्हायरस एस जीन्स यामध्ये इंजेक्शन दिले गेले. यानंतर, आरटी-पीसीआर पद्धतीने वेगवेगळ्या वेळी हवेचे नमुने घेऊन या विषाणूची चाचणी घेण्यात आली. त्यात हे आढळले की ‘एरोलाइज’ एएसआर ६०० एरोबोन इन्फ्लूएंझा ए आणि स्वाइन फ्लूसह कोरोना विषाणूच्या १०० टक्के निर्मूलनास प्रभावी आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.