खाम नदी स्वच्छता आणि वृक्षारोपण ला उत्स्फूर्त प्रतिसाद / Spontaneous response to Kham river cleaning and plantation

Share This News

• 1000 वृक्षांची लागवड, 12 टन कचऱ्याचे निर्मूलन
• प्रशासकांनी मे 15 पर्यंत कार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले

औरंगाबाद– खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत सलग तिसऱ्या शनिवारी लोकसहभाग मोहीम हाती घेण्यात आली. ह्या मोहिमेत हिंदू, मुस्लिम, बुद्ध, ख्रिस्ती आणि सिख समाजाचे धर्मगुरू ह्यांनी सहभाग नोंदवला आणि आपआपल्या समाजाच्या लोकांना नदीची स्वच्छता ठेवण्यास आवाहन केले.
मनपा आयुक्त आणि प्रशासक आणि स्मार्ट सिटी चे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा मार्गदर्शनात जानेवरी महिन्यात खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. ह्यात औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी सोबत छावणी बोर्ड औरंगाबाद, वर्रोक आणि इको सत्वा काम करत आहेत. तीन वर्षाचा ह्या प्रकल्पात पहिल्या वर्षी नदी मधून कचरा काढणे, गाळ काढणे, कचरा पडणे थांबवणे, वृक्षारोपण, नदीकाठचा सौंदर्य वाढवणे आणि सांडपाण्याचा रिसाव थांबवणे योजिले आहे.
शनिवारी लोकसहभाग मोहिमेत भाग घेत असताना श्री पाण्डेय ह्यांनी सर्व सहभागी धर्मागुरुंचे आभार मानले. त्यांनी नदीचा कडेवर वस्त्यांमध्ये राहणारे लोकांना सांगितले की त्यांनी नदीची स्वच्छता ठेवायची आहे आणि ह्याची खबरदारी घ्यायची आहे की कचरा तिथे पडणार नाही. त्यांनी आपल्या टीमला सूचना दिली की मे 15 पर्यंत नदीचा रुंदीकरण, सफाई, वृक्षारोपणाचा, ई. चा नियोजन करा आणि पाऊसाचा आधी कार्य पूर्ण करा.
छावणी बोर्ड सीईओ विक्रांत मोरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड, मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, उपायुक्त अपर्णा थेटे, यांत्रिकी विभाग चे उपअभियंता देवीदास पंडित, स्वच्छता निरीक्षक असादुल्ला खान आणि स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी उपस्थित होते.
वेगवेगळ्या धर्मांचे प्रतिनिधी जशे रेव्हरंड तीमथी शरद, आर. बी. गायकवाड, नवगिरे, हाफिझ अब्दुल हमीद, दत्तप्रसाद जोशी, मंगेश कुलकर्णी, रामकृष्ण बानेगावकर, भदंत महाथेरो हर्षबोधी, मनिंदर सिंह ग्रंथी आणि राजा सिंह ग्रंथी ह्यांनी ह्या मोहिमेला पूर्ण समर्थन दाखवले आहे. ह्या सोबत एमआयटी एम बी ए कॉलेज चे प्रोफेसर आणि विद्यार्थी, इको सत्वा ची टीम, मनपा यांत्रिकी विभाग, गार्डन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, औरंगाबाद स्मार्ट सिटी टीम, एनजीओ लाईफ केअर आणि अन्य संस्था आणि नागरिक सहभागी झाले.
फेब्रुवारी 20 तारिकेची मोहिमेत एकूण 1000 झाड लावण्यात आले आणि 12 टन कचरा उचलण्यात आला. अशीच मोहीम पुढचा शनिवारी पण आयोजित केली आहे. मनपा प्रशासकांनी नागरिकांना ह्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन यशस्वी करणयाचे आवाहन केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.