शहरात तात्पुरते कोविड संक्रमण सेंटर सुरू करा -जवादे

Share This News

शहर व ग्रामीण भागात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील शासकीय व खासगी कोविड सेंटरमध्ये आज रुग्णांकरिता बेड उपलब्ध नाही. त्यामुळे पेशंट दिवसभर वेगवेगळ्या रुग्णालयात फिरून – फिरून शेवटी हतबल होतो त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. ही अवस्था फार गंभीर आहे.


दरम्यानच्या परिस्थितीमध्ये कोविडं रुग्णांची तात्काळ व्यवस्था होणे याकरिता जोपयर्ंत नवीन व्यवस्था कार्यान्वित होत नाही तोपयर्ंत तात्पुरत्या स्वरूपातील व्यवस्था करणे आवश्यक आहे. शहर व ग्रामीण भागातील रुग्ण फार मोठय़ा आशेने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात येतात. परंतु उपजिल्हा रुग्णालयाच्या अपूर्ण सोयीसुविधांमुळे रुग्णांना येथे भरती न करण्यात आल्याने त्यांची निराशा होते खाजगी दवाखान्याचा खर्च त्यांच्या आटोक्याचे बाहेर असतो अशा अवस्थेत रुग्णांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा हतबल झालेल्या रुग्णाचे परिणामी मृत्यूला कवटाळण्याशिवाय मार्ग राहत नाही.


अशी वेळ कुणावरही येऊ नये याकरिता अशा गोरगरीब रुग्णांकरिता एक संक्रमण कोव्हिड उपचार केंद्र तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित होणे गरजेचे आहे. ट्रान्झिट कोविड-१९ सेंटर यामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाची नोंद एका मध्यवर्ती ठिकाणी (उपजिल्हा रुग्णालय) घेण्यात यावी. ज्या दवाखान्यात बेड उपलब्ध आहेत तिथे रुग्णांना भरती करण्यात यावे बेड उपलब्ध नाहीत तेव्हा हे ट्रान्झिट कोविड सेंटरला पाठविण्यात यावे. इथे येणार्‍या रुग्णांना प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतील,दरम्यान जिथे बेड उपलब्ध झाले तेथे या रुग्णांना पाठविण्यात येतील, येणार्‍या प्रत्येक रुग्णाला प्राथमिक उपचार करणारे हे केंद्र कार्यान्वित करता येईल असे हे केंद्र असेल. या उपचार केंद्राकरिता डॉ.बी. आर. आंबेडकर शिक्षण संस्थेचे संस्थापक मंडळ अशा कठीण परिस्थितीमध्ये कोव्हिड रुग्णांना दिलासा देण्याकरिता डॉ. बी. आर. आंबेडकर शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय नंदोरी चौक येथील इमारत सध्या परिस्थिती शाळा बंद असल्याने तसेच शालेय परीक्षा रद्द झाल्याने रिकामी आहे. डॉ. बी आर आंबेडकर विद्यालयात एक ट्रान्झिट कोव्हिडं सेंटर तयार केले तर जवळपास ३0 बेडची उपलब्धता त्या ठिकाणी होऊ शकते. शासन स्तरावरून सकाळ-संध्याकाळ एक डॉक्टर व दोन परिचारिका व दोन वॉर्डबॉय याची व्यवस्था जर होऊ शकली तर तीन दिवसात हे सेंटर सुरू होऊ शकते. विद्यालयाचे परिसरात इमारत क्रमांक २ येथे तळ माळावरील सहा वर्गखोल्या पुढील सत्र सुरू होईपयर्ंत उपलब्ध करून देण्यास ट्रस्टच्या समितीने होकार दिलेला आहे. प्रसाधनगृह, पाण्याची व्यवस्था सुद्धा ट्रस्टच्यावतीने करून घेण्याची ग्वाही दिलेली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण दवाखाना शोधण्यास शहरात फिरण्यास प्रतिबंध होईल. पॉझिटिव असेल अशा रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात थांबण्याकरिता एक ट्रान्झिट कोविड सेंटर तयार झाले तर ते शहरातील गोरगरीब व ग्रामीण भागातील जनतेच्या फायद्याचे होईल. अशाप्रकारचा एक प्रस्ताव अनिल जवादे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना पाठविले आहे. तसेच या प्रस्तावाची प्रतिलिपी शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अजित पवार,उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य, राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, जयंत पाटील, जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य, सुनील केदार पालकमंत्री वर्धा, अनिल अण्णा गोटे माजी आमदार धुळे, पोलिस अधीक्षक वर्धा, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय वर्धा यांना पाठविलेली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.