साकोली चिचगड ते बुढी बंजारी बस सुरु करा Start Sakoli Chichgad to Budhi Banjari bus

Share This News

साकोली ते चिचगड दरम्यान धावणारी बूढी बंजारी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
लाकडावून सुरू होण्याच्या पूर्वी साकोली ते बुड्डी बंजारी बस सतत सुरू होती. लाकडाऊन सुरू झाल्यानंतर ती बस बंद करण्यात आली.राज्य परिवहन मंडळाच्यावतीने सर्व बसेस सुरु करण्यात आल्या परंतु अद्यापही या मार्गावरील ही बस सुरु न केल्याने नागरिकांनी पुन्हा ती बस सुरू करण्याची मागणी केली आहे. ही बस चिचगडला साडेचार वाजे दरम्यान पोहोचायची.शाळा कॉलेज सुटल्यावर त्याच बसने मुलं आपल्या गावी परत जात होती. आणि ती बस चिचगडला हाँल्टींग असायची आणि सकाळी पुन्हा ती बस कडीकसा इस्तारी,मीसपीरी,महाका आणि बुडी बंजारीला जायची.त्या बसने चिचगडला त्या भागातून शाळेत येणाऱ्या मुली आणि मुले तसेच परिसरातील नागरिक यांना येणे जाण्याकरिता सुलभ होत होते.बस बंद झाल्यामुळे शाळेच्या मुला मुलींना देवरी आणि परिसरात येण्या जाण्याकरीता तसेच चिचगड देवरी साकोली येण्या जाण्याकरिता लोकांना गैरसोय होत आहे. त्यामुळे पुन्हा ही बूढी बंजारी बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी,मुला-मुलींनी संबंधित अधिकाऱ्यांना व जनप्रतिनिधींना केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.