राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विट करून दिली माहिती / State Home Minister Anil Deshmukh infected with corona; Self-tweeted information
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे,त्यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करून माहिती दिलेली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं आहे,मात्र योग्य उपचार मिळावा या करिता त्यांना आज रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्याच्या संदर्भात डॉक्टर निरनिराळ्या घेणार असल्याची माहिती आहे.ते साध्य त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आहेत,त्यांनी स्वतःला क्वारंटिन करून घेतले असून गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता,त्यावेळी
राज्य मंत्रिमंडळातील अनेक नेते,आमदार,मंत्री यांच्या सह खासदारांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोना काळात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे सातत्याने सक्रिय राहिले असताना देखील त्यांनी स्वतःचा कोरोना पासून बचाव केला होता. आज ज्यावेळी कोरोना ने नीचांकी पातळी गाठली आहे,अश्या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात सक्रिय सहभाग
दोन दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्याने नागपूरसह काटोल येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते.त्या कार्यक्रमात त्यांनी हजारो नागरिकांसह कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. राष्ट्रवादीच्या राजकीय कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना तिलांजली देण्यात आली होती.