प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे आगमन, काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर नाना पटोले बुधवारी पहिल्यांदाच नागपुरात आले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या स्वागतसाठी काँग्रेसची जय्यत तयारी दिसून. आली यानिमित्ताने काँग्रेसजणांचे शहरात शक्तिप्रदर्शनही दिसले.काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागतार्थ वर्धा मार्गावर मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले . नाना पटोले यांचे आज बुधवारी सकाळी 11.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नाना पटोले येत्या १२ तारखेला पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, नियुक्तीनंतर त्यांचे पहिल्यांदाच आगमन होत असल्याने काँग्रेसजणांमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. दीक्षाभूमी, गणेश टेकडी मंदिर व ताजबाग दरगाह येथे भेट देणार आहेत.