ऑनलाईन वर्ग संदर्भात पालकांचे अधिकाऱ्याना निवेदन
नागपूर
शाळा शुल्कासाठी पालकांना मानसिक त्रास देणार्या सेंटर पॉईंट शाळा प्रशासनाला मुख्यमंत्री सचिवालयाने चांगलेच खडसावले आहे. शासनाकडून निर्देश येईपयर्ंत कुठल्याही शाळेवर कारवाई करू नका, अशी सक्त ताकिद दिली आहे.
सेंटर पॉईंट शाळेने ५ फेब्रुवारीपयर्ंत शुल्क भरा अन्यथा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग बंद करण्याचे पत्र पालकांनाना पाठवले होते. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेचे योगेश पाथरे यांच्या नेतृत्वात सेंटर पॉईंट शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री सचिवालयाला यांना या बाबात निवेदन दिले होते. कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळली असल्याने शाळेचे यावर्षात शुल्कामध्ये सवलत द्यावे, नियमाबाहेरील शुल्क रद्द करावे अशा विविध मागण्या केल्या आहेत. कोरोनामुळे आर्थिकस्थिती ढासळल्याने शाळा प्रशासनाने पालकांचा थोडा विचार करावा, शुल्कामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकार्यांनी शुल्कासाठी ऑनलाईन वर्ग बंद करण्याच्या शाळेच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. शासनाकडून कुठलेही निर्देश येईपयर्ंत ऑनलाईन क्लासेस बंद केल्यास शाळेवर कारवाई करण्याचे आश्वासन पालकांना देण्यात आले आहे. पालकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना सेंटर पॉईंट शाळेविरोधात निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकार्यांनीही शाळा प्रशासनाला फोन करीत वर्ग बंद न करण्याच्या सूचना दिल्या. सेंटर पॉईंट शाळा आणि स्वामीनारायण शाळेच्या शुल्कासाठी ऑनलाईन वर्ग बंद करण्याच्या धोरणाविरोधात पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांची भेट घेत निवेदन दिले.